पत्रकार किशोर लोंढे
दिनांक १७ जुन २०२६ रोजी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्थानक व नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे सर यांच्या माध्यमातून येणाऱ्या मोहरम सणाच्या निमित्ताने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस तुर्भे विभागातील सर्व धर्मीय लोकांचा सहभाग होता.
यावेळी नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे सर यांनी सर्वांना कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहीला पाहिजे व सण ही मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे असे मागदर्शन केले.
तसेच यावेळी मा किशोरदादा कुसुम साईनाथ लोंढे यांनी देखील या वेळी उपस्थित सर्व सदस्यांना संबोधित केले व पुर्वी पासुन तुर्भे विभागातील जनता कोणत्याही प्रकारे जातीयवाद न करता सर्व सण आनंदात व कायदा व सुव्यवस्था राखुन करत आली आहे व यापुढेही असेच होत राहिल व बीट मार्शल यांनी थोडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.
जेष्ठ समाजसेवक आलम बाबा, सुरेश गायकवाड, किशोर राठोड, दादासाहेब गवळी व इतर ही सर्व धर्मातील लोकं उपस्थित होते.
तसेच पोलीस नवनाथ जाधव साहेब व प्रताप दुपारगुडे साहेब यांनी बैठकीचे योग्य नियोजन केले होते.
