भाजपा, नवी मुंबईच्या वतीने विश्व पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

बृज बिहारी दुबे
By -

 रिपोर्ट किशोर लोंढे


विश्व पर्यावरण दिवसाचे अवचीत साधुन भाजपा, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष डॉ राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. किशोरदादा कुसुम साईनाथ लोंढे नवी मुंबई, भाजपा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक ५ जुन २०२६ तुर्भे मंडळाच्या वतीने एक पेड मां के नाम हा कार्यक्रम तुर्भे स्टोअर्स व पावणे नाका, नवी मुंबई येथे साजरा करण्यात करण्यात आला.
यावेळी विविध प्रकारचे वृक्ष लावुन यापुढे त्याची काळजी घेण्याचे ध्येय हाती घेतले, तसेच झाडांमुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. भाजपा नेहमी जन हिताचे काम करत असते, तसेच हा कार्यक्रम जागतिक असल्यामुळे सर्वांनी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली पाहिजे. कारण झाडांमुळे सृष्टी आहे.
तसेच कोणत्या प्रकारची अशा न ठेवता वृक्ष आपणास ऑक्सिजन देत असतो, त्याचे महत्त्व प्रत्येकाने जपले पाहिजे अशी माहिती देखील मा. किशोर दादा कुसुम साईनाथ लोंढे यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थित किशोर राठोड, श्रीकांत कळसगुंडे, दत्तात्रय दिवाने, बळीराम दिवाने, पंडित दिवाने, अंश पांडे, दयानंद (र्विष्णु) लोंढे व इतर ही पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!