सांगली/तासगाव : क्रांतिकारकांनी दिलेले बलिदान आजच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. क्रांतिकारकांच्या योगदानातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काढले. प्राचार्य पुढे म्हणाले क्रांतीकारकांना आदर्श म्हणून पाहिले पाहिजे आणि आपणही समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे असे सांगून क्रांतिकारकांनी मिळविलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने पुढे येण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक,विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. पल्लवी मिरजकर यांनी केले तर आभार शिवा सिंदोळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.ऋतुजा शिंगाडे हिने केले.
रिपोर्ट अतुल काळे