पूर्ण सेवा संस्थानचें आचार्य श्रीकांत महाराज यांची आधार शिक्षण संस्थेच्या दिव्यांग विद्यालयाला भेट

बृज बिहारी दुबे
By -

सांगली/तासगाव : येथील आधार शिक्षण संस्था संचलित दिव्यांग (मतिमंद व मूकबधिर ) विद्यालयात पूर्ण सेवा संस्थानचे अध्यक्ष आचार्य श्रीकांत महाराज यांनी भेट दिली.यावेळी गुरुमाता दिव्यामां अध्यक्ष महिला उत्थान फाउंडेशन,गोपालजी महाराज,सौ.अश्विनी चव्हाण, श्रीनिवास चव्हाण,ऋतुराज जाधव व पूर्ण सेवा संस्थानचे पदाधिकारी तसेच आधार शिक्षण संस्थेचे सचिव संजय राजमाने सर,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मनोज शिंदे नाना इ मान्यवर उपस्थित होते.
श्रीकांत महाराज हे तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत,तसेच ते मोटिवेशनल स्पीकर आहेत.त्यांनी गुरुकुल शिक्षण पद्धतीने शिक्षण पूर्ण केले आहे.त्यासोबत तंत्र शिक्षण विशारद,योगा,आयुर्वेद,ज्योतिष आणि त्यांनी ब्रमारी विद्या मध्ये ध्वणी तंत्राचा शोध घेतला आहे.ते पूर्ण सेवा संस्थांनचे अध्यक्ष असून पूर्ण सेवा संस्थान हे भारतातिल लोकांना रोजगार उपलब्ध करून देते.गोशाळा डेव्हलपमेंट,मुलींचे शिक्षण यासारखे काम ही संस्थान करते.तसेच महिला उत्थान ही संस्था महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते.दिव्यांगाची सेवा तसेच महिलांच्या आरोग्यावर काम करते.यांनी सर्वाइकल कॅन्सरचा अवेअरनेस प्रोग्रॅम सुरू केला आहे.त्याचबरोबर विणकाम,शिलाई काम यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार संधी देत आहेत.याच्यासोबतच गाईंचे गोमूत्र आणि शेण यापासून 65 उत्पादने बनवणे व विक्री करणे याचेही महिलांना प्रशिक्षण देणे हे कार्य करत आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन सौ.अश्विनी चव्हाण यांनी केले.यावेळी बोलताना आचार्य श्रीकांत महाराज यांनी संस्थेचे मनापासून आभार मानले.समाजातील उपेक्षित घटकांसाठी करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केले.त्यांच्या कडून दिव्यांग विद्यार्थ्यांना पूर्ण सेवा संस्थानच्या वतीने ब्लँकेट व खाऊचे वाटप करण्यात आले.शाळेसाठी आवश्यक साहित्य तसेच देशी गायींचे शेण व मलमूत्रापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू निर्मितीसाठी पूर्ण सेवा संस्थान च्या माध्यमातून संपूर्ण मदतीचे आश्वासन यावेळी महाराजांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलकुमार राजमाने सर यांनी केले तर आभार शशांक पाटील सर यांनी मानले.कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव  राजमाने यांचे मार्गदर्शन लाभले.



रिपोर्ट अतुल काळे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!