हर घर तिरंगा अंतर्गत राखी पौर्णिमेचा कार्यक्रम ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस. इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक 7 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. H.C पोलीस श्री. शिवाजीराव सुर्यवंशी यांना या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजाराने करण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यानी त्यांना राखी बांधुन सामन्य नागरिक व पोलीस यांच्यातील संबंध दृढ करून आयुष्यातील खर्या हीरो ला राखी बांधुन आपल्या सुरक्षेसाठी विश्वास निर्माण केला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ. अपर्णा पाटील मॅडम यांनी पोलीस आपले सर्व सण बाजूला ठेऊन आपल्या सुरक्षेसाठी नेहेमी कसे तत्पर असतात ते आपल्या भाषणातून सांगितले.
H.C पोलीस श्री. शिवाजीराव सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांंना शुभेच्छा दिल्यात .या द्वारे विद्यार्थ्यांंना पोलिसांबद्दल अभिमान व आदराची भावना निर्माण झाली.
रिपोर्ट किशोर लोंढे