स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने "हर घर तिरंगा" अभियानांतर्गत आयोजित निवृत्त सैनिक सन्मान समारंभात झालेल्या गौरवाबद्दल माजी सैनिकांनी भाजपा सिंधुदुर्गचे मनःपूर्वक आभार मानले.
सोहळ्यात झालेल्या सन्मानामुळे समाजात अभिमान आणि प्रेरणा वाढली असल्याचे मत माजी सैनिकांनी व्यक्त केले. त्या पार्श्वभूमीवर निवृत्त सैनिकांचा एक प्रतिनिधी मंडळ आज वेंगुर्ला येथील भाजपा कार्यालयात आले. त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व आयोजकांचे आभार मानून भविष्यातही अशा राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या उपक्रमांत सहभाग देण्याची ग्वाही दिली.
भाजपाकडून माजी सैनिक जॅक डिसोझा, माजी सैनिक संतोष चेंदवनकर, माजी सैनिक पुंडलीक धर्णे यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी सैनिकांनी व्यक्त केले की, “भाजपाने आमच्या त्यागाचा व शौर्याचा गौरव करून खरी कृतज्ञता व्यक्त केली आहे. या सन्मानामुळे आम्हाला नवचैतन्य लाभले.”
रिपोर्ट विवेक परब -