सांगली/तासगाव : येथील जुन्या चावडी समोरील स्मृती स्तंभास स्वातंत्र्य सैनिक वारसदार संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रसेवा दल, पुरोगामी समविचारी संघटना व कार्यकर्ते यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले होते. प्रा डॉ बाबुराव गुरव यांच्या हस्ते स्वातंत्र सैनिक स्मृती स्तंभाला पुष्पहार घालण्यात आला.
तासगाव मधील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास सोनेरी पानांनी भरलेला आहे, पण तासगाव मधील जुन्या चावडी समोरील स्वातंत्र्य सैनिक स्मृती स्तंभाची दुरावस्था आणि संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्षामुळे हा इतिहास पुसला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत कार्यकर्ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटी देत असतात. पण स्मृती स्तंभांच्या अवस्थेत काहीही फरक पडत नाही. अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी अभिवादन प्रा वासुदेव गुरव, नुतन परिट, अमर खोत व कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्ट अतुल काळे