सांगली/तासगाव डॉ. बापूजी साळुंखे यांनी ग्रामीण व सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून ज्ञानाची खरी मंदिरे उभारली. त्यांचे कार्य हे केवळ शैक्षणिक मर्यादेत न राहता समाज परिवर्तनाची चळवळ होती. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले. त्याचबरोबर ते दूरदर्शी विचारांचे, कर्तृत्ववान आणि समाजनिष्ठ व्यक्तिमत्व होते. असे प्रतिपादन डॉ. बी. एम. पाटील यांनी केले. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.एल.व्ही.भंडारे,डॉ.डी.टी.
खजूरकर डॉ.ए.एस.चिखलीकर, प्रा.ए.आर.पंडित, कार्यालयीन कर्मचारी संजय कुंभार,हणमंत वाघमारे,सुजाता हजारे,अस्मिता साळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता माने व सुमेधा सुतार यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.प्रमोद शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार नलिनी निकम यांनी केले.
रिपोर्ट अतुल काळे