नवी मुंबई येथे नशामुक्ती जनजागृती अभियान रॅलीचे आयोजन

बृज बिहारी दुबे
By -
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५
स्थळ : कोपरखैरणे, नवी मुंबई.
नवी मुंबई शहरात दिनांक १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त नशामुक्ती जनजागृती अभियान रॅली आयोजित करण्यात आली. रॅली पोलिस विभाग व DVS शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.
रॅलीची सुरुवात सकाळी ९.०० वाजता  DVS English school कोपरखैरणे प्रांगणातून झाली. यामध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. हातात फलक, बॅनर, घोषवाक्ये आणि नारे देत व्यसनमुक्त भारत घडवूया, नशा सोडा, जीवन जिंका अशा संदेशांचा प्रसार करण्यात आला. मार्गात लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
रॅलीचा समारोप शहराच्या चौकात सभा घेऊन झाला, यावेळी पोलीस अधीक्षक, शिक्षक, तसेच विद्यार्थी यांनी पथनाट्य करून व्यसनमुक्त जीवनाचे फायदे व तरुण पिढीला चांगल्या सवयी लावण्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.



रिपोर्ट किशोर लोंढे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!