पत्रकार किशोर लोंढे
आज दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी मुंबई महानगरपालिका मा महापौर, सभागृह नेते व नवी मुंबईतील युवकांचा बुलंद आवाज श्री सागरजी नाईक साहेब यांची भेट घेतली व तुर्भे विभागातील समस्या बाबत माहिती देण्यात आली.
तसेच नवी मुंबईतील विकासामध्ये तुर्भे विभागाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. तसेच येथे रुग्णालये, शाळा, रस्ते व तुर्भे विभागाच्या शेजारी आलेल्या कंपन्या व रोजगार यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली.
यावेळी मा खासदार श्री संजिवजी नाईक साहेबांना देखील पत्रक देऊन सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली.
तसेच आमचें प्रेरणास्थान व भाग्यविधाते, नवी मुंबई शिल्पकार, आमदार, कॅबिनेट मंत्री, वनमंत्री महाराष्ट्र राज्य गणेशजी नाईक साहेब राज्यातील इतर विभागातील पाहणी असल्याने त्यांची कार्यकर्त्यांना भेट घेता आली नाही.
यावेळी सोबत कार्यकर्ते किशोर राठोड, संतोष गुंडाळ, श्रीकांत कळसगुंडे, रवी गुप्ता, दादासाहेब गवळी, धर्मेंद्र गुप्ता, राजकुमार गुप्ता व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
