तुर्भे स्टोअर्स, नवी मुंबई येथे मा परिवहन सदस्य श्री राजेंद्र इंगळे यांच्या भाजपा कार्यालयामध्ये 80 वा स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी भरत कांबळे यांनी ध्वजास हार घालून व बेनबंसी यांनी श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली. समाजसेविका राहुल इंगळे व शितल इंगळे यांनी उदबत्ती पेटून ध्वजास मानवंदना केली.
यावेळी पत्रकार किशोर लोंढे यांनी आलेल्या सर्व जनतेस 80 व्या स्वातंत्र्य दिनाबाबत माहिती दिली.
या 80 व्या ध्वजारोहण होत असताना प्रत्येक नागरिकाने हम सब एक है, ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी महापुरुषांनी व लोकांनी आपले रक्त सांडलेले आहे, त्यांना आपण विसरून चालणार नाही, असे संबोधन केले.
यावेळी तुर्भे स्टोअर्स मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
