पत्रकार किशोर लोंढे
योगामुळे शरीराला व मनाला होणार्या फायद्या बदल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात योग दिन साजरा करतात. त्याचेच औचित्य साधून शुक्रवारी १९ जून २०२६ रोजी ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूलमध्ये योगदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या योग कार्यशाळा व प्रशिक्षण आयोजन करण्यात आले.
योगाचे खास प्रात्यक्षिक करून दाखविण्यासाठी पतांजली कडून सौ.शशी सेहगल, छवी सेहगल, शारदा शिंदे, मंजू गुप्ता या योग प्रशिक्षकांना विद्यालयात बोलवण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऑड. पि. सी. पाटील साहेब, सचिव श्री सि. एम. पाटील, सभासद श्री चंद्रप्रकाश पाटील व सर्व विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
शिक्षक, मुख्याध्यापिका यांनी ही योगा करून योग दिनात सहभाग घेतला.
योगामुळे मनःशांती व स्वास्थ्य चांगले राहते तसेच सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो असे मत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.डाॅ.अपर्णा पाटील यांनी व्यक्त केले.
अशा प्रकारे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात योगा करून आनंदी व निरोगी करण्याचे ठरवून योगदिन पार पाडण्यात आला.
