संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

बृज बिहारी दुबे
By -
.

 रिपोर्ट किशोर लोंढे

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज दिनांक २२ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तुर्भे मंडळ येथील शंकर मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी गुरुवर्य, नवी मुंबईचे लाडके नेते, ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार श्री संदीपभाई नाईक यांच्या शुभहस्ते प्रशस्ती पत्रक घेण्याचे भाग्य रक्तदात्यांना मिळाले.
रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठदान हा उद्देश व विचार देखील या माध्यमातून पोहोचवण्याचे काम केले. प्रथम राष्ट्र व राष्ट्र हीच जोपासण्याचे काम देखील या माध्यमातून माननीय संदीप भाई नाईक यांच्या माध्यमातून झाले व यापुढेही असेच देशा उपयोगी व समाज उपयोगी कार्य करत राहू असे आश्वासन देखील दिले.
कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार मा. किशोर लोंढे यांनी केले.
३० रक्तदात्यांनी उपस्थिती नोंदवली होती त्यातून १६ पात्र झाले व १४ अपात्र झाले. यावेळी माजी नगरसेवक राजेश शिंदे, तुर्भे मंडल अध्यक्ष पंकज आंबेकर, पावणे मंडल प्रभारी श्री सुरेश गायकवाड, प्रभारी आशिष पाटील, युवक अध्यक्ष राहुल इंगळे, सतिश बनसोडे, रवीकिरण गुप्ता, किशोर राठोड, दत्तात्रय दिवाने, राजु दिवाने, सचिन सूर्यवंशी, दादासाहेब गवळी, श्रीकांत कळसगुंडे संतोष गुंडाळ व इतर ही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!