एपीएमसी, नवी मुंबई नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील एंक्शन मोडवर.

बृज बिहारी दुबे
By -
पत्रकार किशोर लोंढे


एपीएमसी, नवी मुंबई पोलिस स्थानकात नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या व तुर्भे जनता मार्केट येथे गंभीर असा विषयावर लक्ष केंद्रित करून त्यावर काम करण्यास सुरुवात केली आहे.
जनता मार्केट या ठिकाणी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला ह्या सर्वत्र वावरतात व त्यांच्या सोबत होणारा व्यवहार हा सर्वांच्या समोर होत असतो, त्यामुळे येथे इतर महीला, लहान मुलांना व इतर ही नागरिकांना गैरसोय व अडचणीत आल्यासारखे होत होते.
तसेच यांचा परिणाम येथुन शाळेला जाणार्या शालेय विद्यार्थ्यी वर्गावर होत आहे. तसेच या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला चाकुने वार करण्याची देखील घटना घडली आहे.
हे सर्व पहाता एपीएमसी नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील एंक्शन मोडवर येत सदर ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी सामान्य नागरिकांना, महीलांना व शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
तसेच एपीएमसी नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या चांगल्या कामाची चर्चा संपूर्ण नवी मुंबई मध्ये होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!