पत्रकार किशोर लोंढे
तुर्भे विभागामध्ये काही दिवसात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व आमली पदार्थ विक्रीच्या प्रमाण वाढ झालेली आहे.
तसेच पोलीस स्थानकात देखील गुन्हा व मारहाण होत आहे.
तुर्भे एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनीलजी शिंदे साहेब यांनी पदभार स्वीकारल्या नंतर तुर्भे विभागामध्ये काही दिवसात वाढलेली गुन्हेगारी व बहुतेक वेळा कायदा सुव्यवस्था मोडेल असं काम करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार का? असा प्रश्न व चर्चा संपूर्ण तुर्भे विभागातील जनता करत आहे.
तरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुनीलजी शिंदे साहेब हे जनतेच्या हिताचे काम करतील का व गरीब व अन्याय्य झालेल्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी आपल्या सहकारी पोलिसांना आदेश देतील का ही बाब येणाऱ्या काही दिवसांत समजेल.
