ऐरोली मतदारसंघातून पुण्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

बृज बिहारी दुबे
By -
रिपोर्ट किशोर लोंढे 

नवी मुंबईतील पामबीच रोडवरून पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी सेक्टर १७, वाशी येथून नवीन "आर्म उड्डाणपूल"चे मा.    नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी से.17 येथे पामबीच मार्गावरुन पुण्याकडे जाण्याकरिता सायन पनवेल महामार्गापर्यंत उड्डाणपूल आर्मचा लोकार्पण समारंभ महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील, उपमहापौर श्री.दशरथ भगत, ड प्रभाग समितीचे सभापती श्री.प्रकाश मोरे, आरोग्य समिती सभापती डॉ जयाजी नाथ, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती सभापती श्री.रविकांत पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री.गिरीश म्हात्रे, नगरसेवक श्री.शशिकांत राऊत, श्री.शशिकांत भोईर, श्री.सुरज पाटील, श्री.निशांत भगत, श्री.संदिप म्हात्रे, श्री.भरत नखाते, उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.सुखदेव येडवे व श्री.सागर मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 
पामबीच मार्गाला सायन-पनवेल महामार्गाशी जोडणाऱ्या या पुलामुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घालावा लागणार नाही. तसेच कोपरखैरणे आणि ऐरोली परिसरातून पुण्याला जाणा-यांसाठी हा मार्ग अधिक उपयुक्त ठरणार आहे. थेट कनेक्टिव्हिटी आणि सिग्नल-फ्री प्रवासामुळे चाकरमान्यांचा वेळ वाचून, चाकरमान्यांचा वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. 
प्रगतीशील नवी मुंबई महानगरपालिकेच्या या पायाभूत सुविधेमध्ये शहरात आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाची भर पडली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!