शेळी फार्मच्या नावाखाली अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन ५ लाख ३९ हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त

बृज बिहारी दुबे
By -

  रिपोर्ट दिपक निगडे
​नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त श्री. संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. दीपक साकोरे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) श्री. सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबईला अमली पदार्थमुक्त करण्याच्या व अमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
​तळोजा पोलीस ठाणे गु.र.नं. ३८४/२०२५, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(सी), १७(ब), २१(ए), २१(बी), २१(सी), २२(ए), २७(ए), २९, सह भा.न्या.सं. कलम १११ या गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी वसीम लुंगीवाला आणि अग्रान पटेल हे सेक्टर-१३/ई, कळंबोली येथील कादरी गोट फार्म (शेळी फार्म) या ठिकाणी असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संदीप निगडे यांना मिळाली होती.
​त्यानुसार, दिनांक १०/०३/२०२६ रोजी वपोनि संदीप निगडे आणि त्यांच्या पथकाने सेक्टर-१३/ई, गणेश नगर येथील कादरी गोट फार्मवर छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले:
१) मोहम्मद वसीम समशुलहक चौधरी उर्फ वसीम लुंगीवाला (वय ५० वर्षे)
२) अग्रान मोहम्मद पटेल (वय ३२ वर्षे)
दोघेही कळंबोली, नवी मुंबई येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, ते शेळी फार्मच्या नावाखाली अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १३ ग्रॅम वजनाचा ५,३९,२०० रुपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी) पावडर हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना १२/०३/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
​आरोपींचा गुन्हेगारी इतिहास:
आरोपी मोहम्मद वसीम समशुलहक चौधरी उर्फ वसीम लुंगीवाला हा मूळचा मुंबईचा असून सध्या कळंबोली येथे राहत आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई परिसरात विविध पोलीस ठाण्यांत एकूण १४ गुन्हे दाखल आहेत:अ.क्र. पोलीस ठाणे व गुन्ह्यांचा तपशील अ.क्र. पोलीस ठाणे व गुन्ह्यांचा तपशील
१ डी. बी. मार्ग पो.ठाणे ८ डी. बी. मार्ग
२ ग. प्र. शा. ९ पायधुनी पो.
३ ग. प्र. शा. १० मा. रा. आं. म
४ ग. प्र. शा. ११ वरळी पो.ठाणे
५ ग. प्र. शा. १२ कळंबोली पो
६ ग. प्र. शा. १३ आर. किडवा
७ वरळी पो.ठाणे १४ बांद्रासदरची उल्लेखनीय कामगिरी श्री. धर्मपाल बनसोडे, सहा. पोलीस आयुक्त, अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप निगडे आणि अमली पदार्थ विरोधी कक्षातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या पथकाने केली आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!