नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून १८ कोटी ६३ लाखाचे अंमली पदार्थ नष्ट"

बृज बिहारी दुबे
By -
नशा मुक्त नवी मुंबई "अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधात सातत्यपूर्ण, समन्वित व कठोर कारवाई करत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नशा मुक्त नवी मुंबई अभियान या कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून दिनांक २६/०९/२०२५ रोजी पर्यंत ११४ गुन्ह्यांमधील एकूण ३८ कोटी ४५ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला होता.
त्याच अभियानाचा पुढील भाग म्हणून आज होळी सणाच्या मुहूर्तावर समाजातील वाईट प्रवृत्तीचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ५५ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला १८ कोटी ६३ लाख ३४ हजार २६५ रुपयांच्या किमतीचे अंमली पदार्थ शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, तळोजा, ता. पनवेल, जि. रायगड या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून पोलीस आयुक्त, नवी मुंबई, श्री. मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, श्री. संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, श्री. प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, श्री. सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त, खारघर विभाग, श्री. विक्रम कदम, वपोनि, अंपावि कक्ष, श्री. संदीप निगडे. यांचे उपस्थित नष्ट करण्यात आलेला आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!