आगरी कोळी बांधव व महिला पुतळ्याचा अवमान करणाऱ्या अज्ञात इसमांना वाशी पोलिसांनी घेतले ताब्यात

बृज बिहारी दुबे
By -
 रिपोर्ट दिपक निगडे
​दिनांक: १२/०३/२०२६
​वाशी पोलीस ठाणे हद्दीतील जुहूगाव चौपाटी, मिनी सीशोर, सेक्टर १०, वाशी, नवी मुंबई येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आगरी - कोळी बांधव व महिलेचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. नमूद पुतळ्याची विटंबना करण्याच्या हेतूने अनोळखी इसमांनी आपआपसात संगनमत करून व्हिडिओ रेकॉर्ड करून सदरचा व्हिडिओ सोशल मीडिया इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्याबाबत माहिती मिळाल्याने तातडीने प्रसंगावधान राखून मा. श्री. पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ १, वाशी, मा. श्री. आदिनाथ बुधवंत, सहायक पोलीस आयुक्त, वाशी विभाग, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जहांगीर मुलाणी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/ सत्यवान बिले, सपोनि/ योगेश भोसले, पोउपनि/दिपक पारध्ये, पोहवा/ १७४ संदिप ढवळे, पोहवा/ १५२१ मंगेश विश्वासराव, पोशि/ संदिप वाघमारे यांनी सदरबाबतची माहिती घेऊन स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून अनोळखी इसमांविरोधात वाशी पोलीस ठाणे गु.र.क्रं. १३६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम २९८, २९९, ३०२, ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७ दिनांक १२/०३/२०२६ अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​नमूद गुन्ह्यातील इसमांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याकामी पोलीस ठाण्याकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने ILAAS_011 या इंस्टा आयडीच्या इसमांचा शोध घेण्याकामी गोपनीय अंमलदार पोहवा/ १७४ संदिप ढवळे यांचे गुप्त माहितीद्वारे व मुंबई येथे तांत्रिक तपास करून इंस्टा आयडी वरील इसम यांचा लल्लुभाई कंपाऊंड, मानखुर्द परिसरात पोलीस उप निरीक्षक बाबासाहेब सांगळे, पोहवा/ १८५० विनोद वारींगे, पोहवा/ १०७९ गणेश बनकर, पोशि/ ४०६८ सागर विरकर यांनी शोध घेऊन नमूद गुन्ह्यातील इसमांना दिनांक १२/०३/२०२६ रोजी त्यांना ताब्यात घेतले.
​नमूद इसमांची आधार कार्ड आणि जन्म नोंदणी प्रमाणपत्र चेक केले असता ते विधी संघर्ष ग्रस्त बालक असल्याचे खात्री झाली आहे. त्यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून नमूद गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. नमूद विधी संघर्ष ग्रस्त बालकांना बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात येऊन गुन्ह्याचा तपास चालू आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!