सा. लहुगड लोकप्रतिनिधी दिपक निगडे वाशी नवी मुंबई
मा. पोलीस आयुक्त सो, मा. पोलीस सह आयुक्त सो, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, नवी मुंबई मा. पोलीस उप आयुक्त सो, परिमंडळ १, वाशी, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो, वाशी विभाग, यांनी अंमली पदार्थ विरोधी विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोशि / १२४६८ राहुल मंगलसिंग भोई व पोशि / १२४७० अशोक मुभाष शिंदे हे वाशी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २५/०२/२०२६ रोजी २१:०० वाजता ते दिनांक २६/०२/२०२६ रोजी ०९:०० वाजे दरम्यान बीट मार्शल क्रमांक ३ वर कर्तव्यावर असताना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत वाशी रेल्वे स्टेशन परिसरात दोन ते तीन इसम एका चारचाकी वाहनातून गांजा हा अंमली पदार्थ विक्री साठी येणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाले वरून दि. २६/०२/२०२६ रोजी पहाटे ०५:०० वा. सुमारास वाशी रेल्वे स्टेशन परिसरातील सिडको एक्झिबिशन व राजस्थान भवन मधील रोडवर, वाशी, नवी मुंबई येथे ओरा ग्रे रंगाची कार क्रमांक MH-50-L-6990 व त्यातील तीन इसमांना ताब्यात घेतले.
त्यांची व वाहनाची पंचसमक्ष अंगझडती घेतली असता:
१) श्याम शिवकुमार वनवानी, वय ४५ वर्षे, रा. उल्हासनगर, ठाणे.
२) संदीप दिलीप पाटील, वय ३५ वर्षे, रा. पर्वती, पुणे शहर.
३) अनिकेत सुनिल तेलंगी, वय २७ वर्षे, रा. पर्वती, पुणे.
यांच्याकडील ह्युंदाई कंपनीची ओरा ग्रे रंगाची कार क्रमांक MH-50-L-6990 मधून एका बॅग (ट्रॉली) मध्ये १२,९१,००,०००/- रु. (बारा कोटी एक्याण्णव लाख रु.) किंमतीचा १२.९१० कि.ग्रॅ. वजनाचा हायड्रो गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. सदर प्रकरणी वाशी पोलीस ठाणे गु.र.क्रं. १११/२०२६ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ कलम ८(क), २०(ब), (ii), २९, दिनांक २६/०२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल असून नमूद तिन्ही आरोपी हे पोलीस कोठडीमध्ये आहेत. सदर गुन्ह्याचा तपास वाशी पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे.
नमूद तिन्ही इसमांकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला आहे:
१. एकूण १२,९१,००,०००/- रु. किंमतीचा १२.९१० कि.ग्रॅ. वजनाचा हायड्रो गांजा.
२. गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई कंपनीची ओरा ग्रे रंगाची कार MH-50-L-6990 (किंमत ५,००,०००/- रुपये).
३. ५०० रु. दराच्या भारतीय चलनाच्या एकूण ५६ नोटा (२८,०००/- रू. रोख).
४. १५,०००/- रू. किंमतीचा सॅमसंग कंपनीचा M36 मोबाईल.
५. २०,०००/- रू. किंमतीचा सॅमसंग कंपनीचा A54 मोबाईल.
६. १५,०००/- रू. किंमतीचा वन प्लस कंपनीचा 6T मोबाईल.
असा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.
सदरची कारवाई मा. श्री. पंकज डहाणे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, वाशी), मा. श्री. आदिनाथ बुधवंत (सहाय्यक पोलीस आयुक्त, वाशी विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चंदीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जहांगीर मुलाणी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / सत्यवान बिले, पोउपनि / बाबासाहेब सांगळे, पोउपनि काशीनाथ नरळे, पोउपनि / वैभव रूपवते, पोहवा / २०५३ आव्हाड, पोहवा / १८५० वारींगे, पोशि / १२४७० शिंदे, पोशि / १२४६८ भोई यांनी केली आहे.
