डमी मशीनद्वारे मतदान प्रबोधन

बृज बिहारी दुबे
By -

रिपोर्ट - अतुल काळे 

सांगली /तासगाव : 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी 3 उमेदवारांना मते देणे अनिवार्य असून नगराध्यक्ष व  नगरसेवक पदासाठी मतदान करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया मतदारांना समजण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती प्रयत्न सुरू आहेत.

    तब्बल सात वर्षांनंतर तासगाव शहरातील मतदार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान करणार असून थेट नगराध्यक्ष  व 24  नगरसेवक निवडीसाठी मतदान होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक मतदानाचा अनुभव नागरिकांना ताजा असतानाच नगरपरिषद निवडणूक होत आहेत. लोकसभा निवडणूक मतदान व विधानसभा निवडणूक मतदान यापेक्षा नगरपरिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया वेगळी आहे. नागरिकांना मतदानाची पद्धत समजण्यासाठी प्रबोधन सुरू आहे. काही उमेदवारांचे प्रतिनिधी घरोघरी फिरून 3 जागांसाठी (नगराध्यक्ष व 2 नगरसेवक) कशा पद्धतीने मतदान करायचे, मशीन मधून येणारा आवाज, याबाबत डमी मतदान यंत्राच्या मदतीने जनजागृती केली जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!