निवडणूक पार्श्वभूमीवर तासगावात तगडा पोलीस बंदोबस्त

बृज बिहारी दुबे
By -

 रिपोर्ट - अतुल काळे 

सांगली /तासगाव : तासगाव शहरात होणाऱ्या नगरपरिषद निवडणूक मतदान आणि मतमोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याची माहिती तासगावचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी दिली. 
     तासगाव नगरपरिषद निवडणूक मतदान दिनांक 2 डिसेंबर रोजी होणार आहे तसेच मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार असल्याने बंदोबस्त कामी 7 पोलीस अधिकारी,  67 पोलीस अंमलदार, वरिष्ठ फलटण नायक, पलटण नायक यांच्यासह 102 गृहरक्षक दलाचे जवान या बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडावी. निवडणूक कालावधीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी. गैरप्रकार घडल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!