तुर्भे MIDC इंदिरानगर (प्रभाग क्र. २०) परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या रस्त्यांची व शाळेची दुरावस्था, अस्वच्छ शौचालये, अनियमित पाणीपुरवठा आणि सारखा खंडित होणारा वीजपुरवठा या गंभीर समस्यांकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. हलगी वाजवा, अधिकारी जागवा या घोषणांनी परिसर दणाणून गेला. इंदिरानगर प्रवेशद्वारापासून माऊली मैदान (बंजारा वाडा) पर्यंत काढलेल्या या मोर्चात शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या आंदोलनाचे मार्गदर्शन जिल्हा प्रमुख श्री प्रकाश पाटील साहेब यांनी केले व नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख व शहरप्रमुख श्री. महेश कोटीवाले यांनी केले. त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, येत्या १५ दिवसांत रस्त्यांची व शाळेची दुरुस्ती, शौचालयांची स्वच्छता व दुरुस्ती, तसेच पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना आणखीन तीव्र आंदोलन करेल.
या आंदोलनात उपशहरप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य विस्तारक श्री. सिद्धाराम शिलवंत,उपविभागप्रमुख जितू गायकवाड, अन्वर खान, शाखाप्रमुख जयेश कांबळे, उपविभाग अधिकारी Er. सचिन चिलमे, तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे आंदोलनाला जबरदस्त ताकद मिळाली. या आंदोलना द्वारे प्रभाग क्रमांक. २० मधील नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी शिवसेनेने पुन्हा एकदा लढ्याची घंटा वाजवली आहे.
शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
झोपलेलं प्रशासन जागं झालंच पाहिजे अशी मागणी व चर्चा संपुर्ण तुर्भे विभागामध्ये व नवी मुंबई मध्ये होत आहे.
