रिपोर्ट अतुल काळे
सांगली /तासगाव : संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे संविधान दिन, शहीद दिन साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये अनुराधा पवार यांनी भारतीय संविधानातील शैक्षणिक हक्क, कायदे व पर्यावरणविषयक संवैधानिक तरतुदींचे वाचन करून उपस्थितांना संवैधानिक जाणीव करून दिली तर बी.एड. भाग-एक व भाग-दोनमधील प्रशिक्षणार्थींनी संविधानाची निर्मिती, त्याची वैशिष्ट्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान योगदान या विषयांवर मनोगत व्यक्त केले.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद देशासाठी प्राणार्पण केलेल्या जवानांना, पोलीस दलातील शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
