रिपोर्ट विवेक परब
मालवण तालुक्यातील नवकवींसाठी यशराज प्रेरणा आचरा व वायंगणी विकास मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा डॅफडिल्स रिसार्ट येथे आयोजित तालुकास्तरीय कविता स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन आचरा उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढून तसेच श्री देव रामेश्वर, श्री देवी सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
ज्येष्ठ कवी रुजारिओ पिंटो व रामचंद्र कुबल यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. अक्षय सातार्डेकर यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
या स्पर्धेत अनुराधा अनिरुद्ध आचरेकर यांनी प्रथम क्रमांक, मधुरा वझे यांनी द्वितीय क्रमांक तर मैत्रीय बांदेकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. अश्विनी सावंत प्रथम उत्तेजनार्थ, भूषण दत्तदास यांना व्दितीय उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सौरभ चव्हाण, सदगुरू साटेलकर, मेहेक शेख, नरेंद्र कोदे, स्वालिया शेख, योगेश मुणगेकर, अर्चना गव्हाणकर यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी निलेश सरजोशी, अनुष्का गांवकर, जयप्रकाश परूळेकर, रविंद्र गुरव, बाबाजी मिसळे, भावना मुणगेकर, अशोक कांबळी, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, अनिरूद्ध आचरेकर, विनय वझे, स्वप्निल गोसावी, मानसी सरजोशी, राजेश भिरवंडेकर, खूशी बापट, गौरी बापट आदी मान्यवर, रसिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भिरवंडेकर यांनी केले तर ॲड. समृध्दी आसोलकर यांनी आभार प्रदर्शन केले.
