रिपोर्ट किशोर लोंढे
नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ची आरक्षण सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ या दिवशी सकाळी १० वाजता वाशी, विष्णूदास भावे नाट्यगृह येथे होणार आहे. या कामासाठी आयुक्तांनी ४ उपायुक्त, मुख्य लेखा परीक्षक, शहर अभियंता, सहाय्यक संचालक नगररचना, सहाय्यक आयुक्त, अधीक्षक आणि २५ वरिष्ठ लिपिक व इतर ही कर्मचारी यांची नेमणूक केली आहे.
या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकाचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढण्यात येणार आहे. तसेच आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहे. आरक्षणाचे प्रारुप सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यामुळे सर्व नवी मुंबईतील पक्षांचे लक्ष या गोष्टीवर लागलेले आहेत. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पक्षांतर व पैशाचा पाऊस पडताना पाहायला मिळेल अशी चर्चा संपूर्ण नवी मुंबईमध्ये होत आहे.
