नवी मुंबई शाहीर क्षेत्रातील संघटनेसाठी जीवन अर्पण करणारे रमेश कदम यांना पहिला खान्देश रत्न राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे
खानदेश कलावंत प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने लोक विधायक सेवावृत्तींना हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जाणार असून त्यांचे स्वरूप रुपये ५१ हजार रोख रक्कम शाल श्रीफळ मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे दोन नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अ.भा.मराठी शाहीर परिषद आणि खान्देश लोक कलावंत प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने मराठी शाहीर लोककलाकार तसेच चलचित्रण कलाकारांचे संमेलनाचे आयोजन जळगाव येथील माजी सैनिक सभागृहात करण्यात आले आहे. आचार्य अत्रे व शाहीर अमर शेख ही श्रद्धास्थाने असणाऱ्या रमेश कदम यांची जडणघडण राष्ट्रसेवादलात झाली वयाच्या 12 व्या वर्षापासून लेखनास प्रारंभ दैनिकात लेखन प्रबोधन तथा अन्याय निवारणाची मोहीम राबवून युवक चळवळ स्त्रीमुक्ती आंदोलनास सक्रिय सहाय्य केले अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद शाहीर अमर शेख पुरस्कार समिती शाहीर साबळे प्रतिष्ठान मराठी लोककला प्रतिष्ठान भारतीय नृत्य कला प्रतिष्ठान महानगर कामगार परिषद आदी संस्थांचे ते संस्थापक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अध्यक्ष- वार्ड क्रमांक ३८ कोपरखैरणे नवी मुंबईचे श्री दिपक किसन बदक यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा
