रिपोर्ट किशोर लोंढे
आज रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सेक्टर ५, कोपरखैरणे, नवी मुंबई अण्णासाहेब पाटील स्मृती भवन येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नवी मुंबईतील सर्व इच्छुक उमेदवारांना, पदाधिकारी, युवासेना, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नवी मुंबईतील समस्त शिवसेना पदाधिकाऱ्यांना या शिबिरात संबोधित करीत असताना आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले. आगामी निवडणूक ४ च्या प्रभाग रचना पद्धतीने होणार असल्याने ४ प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवारांनी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुढील काळात योग्य व घरोघरी जाऊन याद्यावर काम करणे गरजेचे आहे.
या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्वांनी एकत्र राहून काम केले तर विजय आपलाच असेल असे मत दोन्ही जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे साहेब व प्रकाश पाटील साहेब यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई जिल्हा संघटिका रंजनाताई शिंत्रे यांनी सर्व एकनिष्ठ शिवसैनिकांना निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले.
संपर्क प्रमुख एम के मढवी यांनी या निवडणुकीला तन मन धनाने काम करुन नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकविणार असे मत प्रकट केले.
मा. खासदार व ठाणे जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खंबीर नेतृत्व व ढाण्या वाघ राजन विचारे साहेब यांनी लढु व विजयी होऊ अशी घोषणा केली. तसेच सर्व इच्छुक उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सोबत.
उप जिल्हा प्रमुख शत्रुघन पाटील, महेश कोटीवाले. उप शहर प्रमुख सिद्धाराम शीलवंत. विभाग प्रमुख विश्वास पाटील, विघ्ने साहेब. उपविभाग प्रमुख सलिमभाई शेख. शाखाप्रमुख किशोर राठोड तसेच शिवसेना -युवासेना -युवतीसेना, महिला पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
