सांगली/तासगाव : तासगाव नगर परिषद निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 34 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये 105 जणांचा सहभाग निश्चित झाला आहे.
नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात एकूण 6 उमेदवार आपले नशीब आजमावणार असून नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठी 99 जणात लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा महादेव पाटील यांच्यासह सानिका अर्जुन थोरात, सविता दत्तात्रय लुगडे, रोहिणी विनोद धोत्रे, सुमन शंकर माळी, जमीर इस्माईल मुजावर, अरमानहुसेन मुल्ला, वैभव वसंत पाटील, स्वाती वैभव पांढरे, पुनम योगेश सूर्यवंशी, विकास गणपत कोकळे, शोभा मधुकर पाटील, जाफर कादर मुजावर, शोएब जाफर मुजावर, विशाल गोविंद शिंदे, रूपाली अंकुश लुगडे, हमीना तांबोळी, समीर अयुब मुल्ला, सौरभ संभाजी सूर्यवंशी, सुभाष देवकुळे, सोनाली किरण कुंभार, प्रियंका विश्वजीत पाटील, प्रियंका माने, पृथ्वीराज अशोक विसापूरकर, सुधाकर देवकुळे, अविनाश भिमराव पाटील, पुनम सुशांत पैलवान, किरण उत्तम पोरे, दिनकर आत्माराम जाधव, विजया बाळासो जामदार, सौरभ रवींद्र शिंदे, प्रसाद भारत पैलवान, दिग्विजय प्रताप पाटील, सीमा महादेव पाटील आदी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून प्रत्यक्ष रिंगणातील उमेदवारांनी प्रचाराच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.
