सर्व शिक्षण अभियानांतर्गत मोफत व सक्तीचे शिक्षण right to education RTE ही योजना भारत सरकारने तळागाळातील वंचित घटकांना आर्थिक परिस्थितीने कमकुवत ज्यांचे शिक्षण आर्थिक कारणांमुळे नुकसान होऊ नये कोणताही मुलगा आणि मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून योजना चालू केली आहे.याच योजनेला मोठ्या प्रमाणावर हरताळ फासण्याचे काम व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान काही शैक्षणिक संस्था करत आहेत. घणसोली नवी मुंबई येथील मदर तेरेसा या शैक्षणिक संस्थेने राईट टू एज्युकेशन अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्कूल ऍक्टिव्हिटी च्या नावे पैसे उकळण्याचे काम करत आहे. विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटीच्या नावे पैसे भरण्यासाठी त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. अशी तक्रार वंचित बहुजन आघाडी उमेदवार , माजी जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत चिकणे साहेबांकडे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने विक्रांत चिकणे व त्यांच्या टीमने शाळेला भेट देऊन खरी परिस्थिती जाणून घेतली व शैक्षणिक संस्थेला याविषयी जाब विचारण्यात आला.हे प्रकरण अति गंभीर झाल्यामुळे संस्थेने आपली चूक मान्य करून पक्षाला यापुढे मुलांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवले जाणार नाही विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर फी वसूल केली नाही असे आश्वासन दिले.
वंचित बहुजन आघाडीचे महिला पदाधिकारी सीमा कांबळे,अंकुश गायकवाड, थोरात साहेब,अशोक शेगावकर, किशोर औसरमल,बाबासाहेब मेहते,भाऊराव भालेराव,सुनील साबळे,युवराज कांबळे या सर्व कार्यकर्त्यांच्या लढ्याला यश आले.
पालकांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
रिपोर्ट किशोर लोढे
