पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ” स्वच्छता अभियान
सांगली/तासगाव : स्वच्छतेसाठी प्रत्येकाने सजग असावे.स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परिसरात स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमात बोलताना काढले.
भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) तसेच महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” अभियान २०२५ अंतर्गत भव्य स्वच्छता उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५ सप्टेंबर २०२५ रोजी “एक दिन, एक घंटा, एक साथ” या घोषवाक्याखाली हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यपक,एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी छात्र, प्रशासकीय सेवक वर्ग यांनी उत्साहाने सहभाग घेतला. महाविद्यालय परिसराची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेवून संकल्प केला.या उपक्रमामुळे समाजामध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढून स्वच्छ भारत मिशनला नवे बळ मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.तर आभार प्रा.एस.आर.पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनुराधा निंबाळकर यांनी केले.कार्यक्रमाला डॉ.अमोल सोनवले यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
