जिद्दीतून 'राजश्री ट्रेडिंग' ची प्रेरणादायी वाटचाल रमाकांत मालू

बृज बिहारी दुबे
By -


सांगली/तासगाव : जिद्द व अखंडित कष्टातून राजश्री ट्रेडिंग कंपनी सर्वसामान्यापासून धनदांडग्यापर्यंत पोहचली. अविरत सेवेतून राजश्री ट्रेडींग कंपनी मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीला उतरली, असे गौरवउद्गार समृद्धी उद्योग समूहाचे संस्थापक रमाकांत मालू यांनी काढले. समृद्धी मल्टीपर्पज हॉल, तासगाव येथे राजश्री ट्रेडिंग कंपनीच्या रौप्य महोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 

    यावेळी, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून माजी नगराध्यक्ष अजय (काका) पाटील यांनी अभिजीत पवार यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रसंगी, प्रमुख अतिथी म्हणून समृद्धी उद्योग समूहाचे संस्थापक रमाकांत मालू, संचालक ओमप्रकाश मालू, अनिष मालू आणि मालू कुटुंबीयांची उपस्थिती लाभली.

     कार्यक्रमाचे स्वागत राजश्री ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत पवार व प्रास्ताविक सौ.शैलजा अभिजीत पवार यांनी केले. यावेळी, कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला. सन 2000 साली छोट्याशा खोलीत व्यवसाय सुरू केला. त्यानंतर समृद्धी उद्योग समूहाचे उत्पादन विक्रेते म्हणून त्यांनी सुरुवातीला काम सुरू केले. त्यांच्या अखंडित व प्रामाणिक कष्टातून त्यांना जिल्हा व पुढे विभागीय डीलरशिप मालू यांनी दिली.

      मालू यांनी दिलेल्या संधीचे सोने करत आज अभिजीत पवार, शैलजा पवार यांनी समृद्धी उत्पादनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल सुरु केली. यामध्ये पवार कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. तर पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज 'रौप्य महोत्सव' कार्यक्रम आयोजित करीत कंपनीसाठी मागील पंचवीस वर्षात ज्यांनी-ज्यांनी सहकार्य केले अशांची कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा यथोचित सन्मान केला. 

    समृद्धी उद्योग समूहातील प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात विक्री करून लोकांच्यात समृद्धीचा विश्वास निर्माण केल्याबद्दल रमाकांत मालू तसेच मालू कुटुंबियांकडून अभिजीत पवार, शैलजा पवार तसेच त्यांच्या आईचा मोठा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. प्रसंगी, समृद्धी उद्योग समूहाचे प्रतिनिधी आर. टी.पाटील, मनोज मोहिते, निलेश इंगळे उपस्थित होते.

     यावेळी, अभिजीत पवार यांच्या डीलरशिपच्या (समृद्धी) सर्व अधिकृत विक्रेत्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. यावेळी, कोरेगावचे मनाली ट्रेडिंग कंपनीला गोल्ड मेडल तसेच, विभागातील अधिकृत विक्रेत्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 

    त्याचबरोबर, अभिजीत पवार यांना नेहमी सहकार्य करणारे अमितकुमार चव्हाण, बबन नलावडे, युवराज हुलवाणे, माणिक महाडिक, रमेश कदम, विशाल घोरपडे, नामदेव माळी, इंजिनीयर सुनील माळी, प्रमोद होमकर, रोहित पवार, अनिल पवार आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी घोरपडे यांनी तर आभार वेदांत पवार यांनी व्यक्त केले.


रिपोर्ट अतुल काले

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!