सांगली/तासगाव : देशाला जोडण्याचे काम एक भाषा करते. हिंदी भाषेने देशाला जोडण्याचे काम केले .भाषेचा गौरव करणे म्हणजेच देशाचा गौरव करणे असे उद्गार प्रो. डॉ.सिद्राम खोत यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे हिंदी दिवसाच्या कार्यक्रमात बोलताना काढले.ते पुढे म्हणाले प्रत्येक देशाची एक भाषा असते आणि ती भाषा त्या देशातील लोकांना जोडून ठेवण्याचे काम करते.भारतासारख्या विविध भाषा आणि बोलींचा देश याचा गौरव आपण प्रत्येकाने केला पाहिजे. पत्रकारिता हा समाजाचा चौथा स्तंभ असून त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू त्यांनी मांडल्या.तसेच त्यांनी शेतकरी , दलित , नारी यांच्या ज्वलंत प्रश्न या विषयावरही भाष्य केले.हिंदी सप्ताहात घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी भाषेचे महत्व आणि विविध भाषा आत्मसात करण्याचे तंत्र याविषयी आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून हिंदी विभागाच्या वतीने आय के एस या विषयाअंतर्गत हिंदी साहित्य संत परंपरा या विषयावर पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .हिंदी विभागाच्या वतीने हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्या सप्ताहामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .त्यामध्ये निबंध ,वक्तृत्व ,शेरोशायरी , पोस्टर मेकिंग आणि हस्ताक्षर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . त्याचे पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.निशाराणी देसाई यांनी केले तर आभार डॉ.अश्विनी देशिंगे यांनी मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.जे .ए यादव , नॅक समन्वयक डॉ.जीवन घोडके,डॉ.अर्जुन वाघ, डॉ अमित माळी,डॉ.विलास साळुंखे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
