आदर्श कॉलेज ऑफ फॉर्मसी विद्यार्थ्यांची तासगावात क्षयरोग जनजागृती

बृज बिहारी दुबे
By -


  (रिपोर्ट अतुल काळे )

सांगली/तासगाव : आदर्श कॉलेज ऑफ फॉर्मसी विटा येथील विद्यार्थ्यांनी तासगाव येथील गणपती मंदिर परिसरात जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त क्षयरोग जनजागृती केली.

    या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी औषधनिर्मिती दिनाच्या घोषवाक्यवर आधारित फलक घेऊन रॅली काढली. तसेच थिंक हेल्थ, थिंक फार्मसिस्ट हा उपक्रम पार पाडला. एका पथनाट्य‌‌तून क्षयरोगा विषयी माहिती पोहोचवली.क्षयरोग कसा होतो, लक्षणे कोणती व तो बरा होतो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला व उपस्थित लोकांचे अभ्यास व्यक्त केले.
 रॅलीनंतर शहरातील मेडिकल ला भेट देऊन त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या फार्मसिस्ट ना गुलाब पुष्प देऊन जागतिक फार्मसिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन. एस . महाजन, प्रा. अनिकेत आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्या पाटील, ऐश्वर्या जाधव, वसुधा विभूते, आरती खाडे, आरती पवार, अंकिता थिटे, पूजा सावंत, सानिया तांबोळी, प्रणाली वाघमारे, सानिका देशमुख, वैष्णवी पाटील, भाग्यश्री जाधव, रेश्मा पवार, प्रज्ञा दामटे, विश्वजीत कालबागे, या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!