(रिपोर्ट किशोर लोंढे)
माथाडी कामगार चळवळीचे व मराठा आरक्षणाचे जनक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट, तुर्भे नवी मुंबई येथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास वनमंत्री मा.गणेशजी नाईक साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री.शिवेंद्रराजे भोसले, मंत्री मा.श्री.जयकुमार रावल, मा.आ.प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे, मा.आ.श्री. नरेंद्रजी पाटील साहेब, आमदार सौ.मंदाताई म्हात्रे, आमदार श्री.निरंजन डावखरे, आमदार श्री.मनोजजी जामसुतकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी उल्लेखनीय काम करणाऱ्या माथाडी कामगारांना “माथाडी भूषण” या पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच कै.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना धनादेश सुपूर्द करण्यात आले.
