स्थानिक स्वराज्यची निवडणूक कार्यकर्त्यांची ; कार्यकर्त्यांना बळ देऊन पूर्ण ताकदीने लढणार माजी खासदार संजयकाका पाटील

बृज बिहारी दुबे
By -

(रिपोर्ट अतुल काळे )

सांगली /तासगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांनी आजपर्यंत मला मदत केली. कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार असल्याची भूमिका माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली.
    यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका जानेवारी पर्यंत संपवाव्यात असे कोर्टाचे आदेश आहेत. याच पार्श्वभूमीवर तासगाव कवठेमहांकाळ मधील कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवार दि. 27 रोजी तासगाव येथे आयोजित केला आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याने सामान्य कार्यकर्त्याला विचारून निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल. गेल्या निवडणुका कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी लढल्या, या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी विकास आघाडी, पक्ष, अपक्ष अशी लढत दिली मात्र ही लढाई कार्यकर्त्यांना विचारून पुढील धोरण आखले जाईल. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत गप्प बसणार नाही. यापूर्वीही संघर्ष केला आहे, पुढेही करत राहणार. कार्यकर्त्यांचा निर्णय ऐकून तन मन धनासह  24 तास कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी देणार असल्याचे संजयकाका यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!