सकारात्मक वापर केला तर एआय मुळे फायदा -प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे

बृज बिहारी दुबे
By -
(रिपोर्ट अतुल काले)


सांगली/तासगाव : मानवाची सामाजिक प्रगती होत असताना अनेकवेळा उत्क्रांती झाली. जसे औद्योगिक उत्क्रांती ,डिजिटल उत्क्रांती त्याचप्रमाणे आत्ता ए आय ची उत्क्रांती झाली आहे. सकारात्मक वापर केला तर  एआय मुळे फायदाच होईल असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मुक्त विचारमंच च्या कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले ए आय तंत्रज्ञान शहाणपणाने वापरलं तर चांगलं आहे.कॅन्सर सारख्या काही दुर्धर आजारावर लवकर उपचार करता येऊ शकतो. रोबोटिक सर्जरी करण्याची क्षमता ही वैज्ञानिक प्रगती मुळेच झाली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे ज्ञान व्हावे आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मुक्त विचार मंच ही संकल्पना मांडली आहे.या कार्यक्रमात कु.श्रावणी संकपाळ ,शेखर माळी कु.प्रज्ञा सुतार, पृथ्वीराज चव्हाण, सोहम भिवरे या विद्यार्थ्यांनी एआय शाप की वरदान या विषयावर आपली अभ्यासपूरक मते मांडली.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल सौ.सुनीता महाडिक यांनी केले. तर आभार नॅक समन्वयक डॉ.जीवन घोडके यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. डॉ. अश्विनी देशिंगे , डॉ. रामा रोकडे, प्रा. रोहित लोंढे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.नरेंद्र कुलकर्णी,वार्षिक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ. साईनाथ घोगरे,राजशेखर चव्हाण,गजानन देसाई यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!