सांगली/तासगाव : राष्ट्रीय शैक्षणिक शैक्षणिक धोरण २०२० मुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबरच वाचनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये उपलब्ध असणारी अनेक साधने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता साधने अवांतर वाचनासाठी एक संधी आहेत असे उद्गार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष,वाणिज्य विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले.ते पुढे म्हणाले पूर्वीच्या काळी पुस्तकांची संख्या खूप कमी होती, आता लायब्ररी अपडेट झाली आहे. जगातील कोणतेही पुस्तक तुम्ही वेगवेगळ्या ॲप च्या माध्यमातून वाचू शकता. लायब्ररी आणि क्लासरूमच्या व्यतिरिक्त अजून बरीच साधने आहेत ज्यामधून विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक हित जोपासता येते. त्याचा योग्य वापर करून आपला अवांतर वाचनाचा छंद जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर.आय.टी. इस्लामपूर चे ग्रंथपाल श्री.विश्वास हसे यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत असणारी व अभ्यासासाठी आवश्यक असणारी ए.आय.साधनांची माहिती देऊन प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी सदर. साधने कशी वापरायची याची माहिती विद्यार्थ्यांना दिली व विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये ए. आय.च्या साधनांचा वापर जास्तीत जास्त अभ्यासक्रमासाठी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.अमोल सोनवले यांनी केले. तर आभार ग्रंथपाल सौ. सुनिता महाडीक यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रुती परचुरे यांनी केले. या कार्यशाळेला उपप्राचार्य जे.ए.यादव, कॅप्टन डॉ. विनोदकुमार कुंभार, डॉ. साईनाथ घोगरे, डॉ.अमित माळी, प्रा.नेहा मोरे, प्रा.एस.एच.यमगर, प्रा.रणजीत कुंभार, प्रा.आण्णासाहेब बागल, राजशेखर चव्हाण यासह प्राध्यापक, विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्ट अतुल काळे
