सांगली /तासगाव : तासगावच्या चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर शाळेमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस म्हणजे 'शिक्षक दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर सामूहिक प्रार्थना संपन्न झाली. यावेळी शाळेतील शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालेय विद्यार्थ्यांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांसोबतच्या आठवणी सांगताना उपस्थितांचे उर भरून आले. मुख्याध्यापक श्री जोग यांनी विद्यार्थ्यांना व सहकारी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इ.१०वी ब मधील विद्यार्थी अब्दुल पठाण याने तर सूत्रसंचालन नितीन जोशी सर यांनी केले. श्री स्वामी सर यांच्या आभार प्रदर्शनाने शिक्षक दिन कार्यक्रमाची सांगता झाली.
रिपोर्ट अतुल काले
