श्रावण महिन्यातील महत्त्वाचा एक सण म्हणजे श्रीकृष्णजन्माष्टमी. ह्याच दिवसाचे औचित्य साधून ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूल मध्ये गोकुळाष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ.अपर्णा पाटील मॅडम यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी श्रीकृष्ण व गीते बदल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नर्सरी ते सातवी च्या विद्यार्थ्यानी राधा कृष्णाची वेषभूषा केली होती. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मनोरे रचून दहीहंडी फोडली.
नंतर विद्यार्थ्यानी राधाकृष्ण लिलावर नृत्य सादर केले.
प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नर्सरी ते सातवी पर्यंतचे विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
रिपोर्ट किशोर लोंढे