पत्रकार किशोर लोंढे
ज्ञानविकास संस्थेच्या डी.व्ही.एस इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यानी शिक्षक, मुख्याध्यापक व शिपाई बनून उत्तम रित्या एकदिवसीय शाळा चालवली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ.अपर्णा पाटील मॅडम यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यांनी शिक्षकांचे जीवनातील महत्त्व या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे कौतुक केले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व प्रेम आपल्या भाषणातून व्यक्त केले.
तसेच देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी महत्त्वाचा वाटा हा शिक्षक उचलतात व त्यांचे उपकाराची परतफेड करण्यासाठी मुलांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करणे गरजेचे आहे.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
