भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई अंतर्गत पावणे मंडळ प्रभारी पदी भाजपचे जुने, ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते श्री. सुरेश गायकवाड यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून अनेक वर्षे सातत्याने संघटनात्मक कार्य करणाऱ्या सुरेशजींना मिळालेली ही जबाबदारी त्यांच्या कार्याची योग्य पावती आहे.
त्यांच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा निश्चितच पावणे मंडळातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मोठा फायदा होईल.
नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या नेतृत्वाखाली पावणे मंडळात भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक भक्कम आणि प्रभावी होवो, हीच सदिच्छा.
हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
