रिपोर्ट किशोर लोंढे
30 जून 2026 पासून नवी मुंबईमध्ये सतत पाऊस लागल्यामुळे महात्मा गांधी नगर नेरूळ नवी मुंबई येथे 23 घरांमध्ये पावसाचा पाणी शिरल्या असल्यामुळे दिनांक 6 जुलै 2026 रोजी 4.00 वाजता युवा संस्थेच्या वतीने व घर हक्क संघर्ष समितीच्या सहकार्याने 23 किट धान्याचे व एक किलो गोड तेल वाटप करण्यातआले.
दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 8.15 मिनिटाला जांभळीच्या झाडाच्या फांद्या जोरदार हवा कावधानामुळे फांद्या तुटून दोन घरावर कोसळल्या ने दोन्ही घराचे पत्राचे नुकसान झाले असल्यामुळे युवा संस्थेच्या वतीने व घर हक्क संघर्ष समितीच्या सहकार्याने पत्रे फुटल्या असल्या कारणामुळे तात्पुरती प्लास्टिक 25 × 15 चे 2 प्लास्टिकचे सेट व 2 परिवाराला धान्याचे किट व दोन दोन किलो गोड तेल देण्यात आले.
घनसोली सेक्टर 21 तळवली गावदेवी रोडवर श्री स्वामी समर्थ रहिवासी संघ मध्ये रोडवर असलेल्या जांभळी चा झाडाच्या फांदी लवकरात लवकर नवी मुंबई महानगरपालिकेने छाटणी करून घ्यावे जेणेकरून पुढे होणारा अनर्थ टळेल.
खाजामिया पटेल.
उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश.
घर हक्क संघर्ष समिती.
9324568912.
