डी.वी.एस इंग्रजी माध्यम शाळेत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्म्यांचे वाटप

बृज बिहारी दुबे
By -

 रिपोर्ट किशोर लोंढे

डी व्ही एस इंग्रजी माध्यम शाळेत दिनांक २० मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची डोळ्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. अपर्णा पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!