प्रतिनिधी - अतुल काळे
सांगली /तासगाव : सांगली शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित श्रीमान आबासाहेब गरवारे विद्यार्थी व श्रीमती विमलाबाई गरवारे वक्तृत्व स्पर्धा चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर तासगाव शाळेमध्ये उत्साहात पडली.
अनेक वर्षांची परंपरा असलेली, नावाजलेली गरवारे वक्तृत्व स्पर्धा यावर्षी देखील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर प्रशालेच्या यजमान पदाखाली उत्साहात संपन्न झाली. बालगट, कुमार गट आणि युवक गट अशा तीन गटात स्पर्धा पार पडली. सांगली शिक्षण संस्थेच्या 14 माध्यमिक शाळांमधील 91 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. चंपाबेन शाळेची माजी वक्तृत्वकुशल विद्यार्थिनी डॉ.नित्या परचुरे ही प्रमुख अतिथी म्हणून तर शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद जोग अध्यक्ष म्हणून लाभले. विद्येची देवता सरस्वती व श्रीमान् आबासाहेब गरवारे व विमलाबाई गरवारे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. वाचनाचा छंद सर्वच विद्यार्थ्यांनी जोपासायला हवा असा उपदेश डॉ. नित्या यांनी विद्यार्थ्यांना केला.
दुपारच्या सत्रात स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमास तासगाव येथील प्रथितयश आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.वरदा वाटवे या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संतुलित आहार व व्यायामाची आवड जोपासायला हवी असे डॉ. वाटवे म्हणाल्या.
वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - लहान गट मुले:- सुयोग गोखले, पटवर्धन हायस्कूल सांगली (प्रथम क्रमांक), समर्थ टेके चंपाबेन (द्वितीय), अथर्व चव्हाण, चंपाबेन (तृतीय), साहिल मुलाणी, पटवर्धन हायस्कूल (उत्तेजनार्थ), लहानगट मुली :- ईश्वरी माईणकर, चंपाबेन (प्रथम), इरा जोशी, सिटी हायस्कूल (द्वितीय), परिमल टिळे चंपाबेन (तृतीय), वेदिका लांब महात्मा गांधी विटे (उत्तेजनार्थ), मध्यमगट मुले:- वेदांग कुलकर्णी महात्मा गांधी विटे (प्रथम), श्रेयश बडवे सैनिकी शाळा (द्वितीय), ऋतुपर्ण बापट सिटी हायस्कूल (तृतीय), वेदांत पाटील बुधगाव हायस्कूल (उत्तेजनार्थ), मध्यमगट मुली:- शरयू पाटील पुरोहित कन्या (प्रथम), मिताली शिंदे शहा विद्यामंदिर लेंगरे (द्वितीय), सेजल जगदाळे पुरोहित कन्या (तृतीय), शुभा बापट सिटी हायस्कूल (उत्तेजनार्थ) युवक गट- शेखर ऐवळे, प्रथमेश हेगडे, कैफ शिकलगार, लेंगरे हायस्कूल अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक, युवक गट मुली:- निकिता शिंदे, गौरी तुपे लेंगरे हायस्कूल अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक व वैभवी ऐवळे महात्मा गांधी विटे (तृतीय) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालासमिती अध्यक्ष रवींद्र देवधर, शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद जोग यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुणे परिचय श्री जोशी व सौ.माळी यांनी केले. सौ.मिरजकर व सौ.गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
