रिपोर्ट किशोर लोंढे
सिडको आणि नवी मुंबई विमानतळ प्रशासनाचा स्थानिक, मराठी भाषिकांना ८०% नोकऱ्या देणाऱ्या धोरणाला हरताळ. माहिती अधिकारात मिळाली माहिती. नवी मुंबई विमानतळात निर्माण होणाऱ्या १ लाख नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात घालणार.
मराठी तरुणांना प्राधान्याने नोकऱ्या नाही दिल्या तर मनसे भव्य मोर्चा काढणार अशी माहिती मनसे नेते गजानन काळे साहेब यांनी दिली. पत्रकार परिषद घेऊन ही माहिती प्रसारित करण्यात आली.
तसेच यावर कारवाई करुन तोडगा काढला नाही तर धावपट्टी उखडणार असा इशाराही देण्यात आला.
फक्त मराठी जनतेला स्वप्न दाखवायची व पुर्ण परप्रांतीयांची करायची का? हा प्रश्न नवी मुंबईतील जनता विचारत आहे.
