तुर्भे विभागामध्ये काही दिवसापूर्वी नवीन पाण्याच्या टाकीतून पाईप लाईनच्या कनेक्शन करण्यात आले होते. तरी ठेकेदाराने जागोजागी खड्डे करून संपूर्ण तुर्भे विभाग खड्डेमय केला आहे. पाईपचे कनेंक्शन झाल्यानंतर देखील ठेकेदाराने योग्य रीतीने खड्डे न भरल्यामुळे पावसानंतर पुन्हा तिथे खड्ड्यांचे स्वरूप निर्माण झालेल आहे. त्यामुळे संपूर्ण तुर्भे विभागातील रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहेत. संपूर्ण चुकी ही पाणीपुरवठा विभागातील ठेकेदार याची असून देखील त्याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. तरी सदर दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी एक आई आपल्या मुलीला रस्त्यावर घेऊन जात असताना खड्ड्यांमळे पडून जखमी झालेले आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग यांचा आंधळेपणा व ठेकेदाराचा बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत आहे. अशी माहिती त्या महिलेने दिलेली आहे. तसेच विभाग अधिकारी सागर मोरे व स्थापत्य विभाग हे या गोष्टीवर ठेकेदारावर कारवाई करतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे
पाणीपुरवठा ठेकेदारामुळे तुर्भे विभागातील महीला जखमी
By -
November 17, 2025
