नवी मुंबई, तुर्भे स्टोअर, लुम्बिंनी बुद्ध विहार मार्ग येथे 15 ते 20 दिवसा पासून ठेकेदाराच्या माध्यमातून काम बंद करण्यात आले आहे. एक लहान मुलगी उघड्या व अर्धवट पडलेल्या नाल्यात पडून तिला इजा झाली आहे. तसेच अधिकारी वर्ग प्रभागात फिरत नसल्याने ठेकेदार हे तुर्भे विभागामध्ये मनमानी कारभार करत आहेत व कामाच्या ठिकाणी बोर्ड न लावण्यामागचे गौडबंगाल काय आहे, असे बरेच प्रश्न तुर्भे विभाग, नवी मुंबई येथील जनता विचारत आहेत.
तुर्भे विभागातील विभाग अधिकारी सागर मोरे यांचे यावर पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण केले नाही, तर तुर्भे विभागातील कार्यालयवर निषेधार्त मोर्चा काढण्यात येईल, व स्थापत्य विभागाचा जाहीर निषेध करण्यात येईल अशी माहिती ॲड. ज्ञानदीप निकाळजी उपाध्यक्ष RPI (A) गट यांनी दिली.
तुर्भे विभागामध्ये विभाग अधिकारी व स्थापत्य विभागातील अधिकारी यांचे लक्ष नाही. त्यामुळे दत्तात्रय दिवाने व किशोर राठोड यांनी स्थापत्य विभागाचा जाहीर निषेध केला.
