रिपोर्ट -विवेक परब
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून उपसरपंच नवलराज काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सडूरे शिराळे ग्रामपंचायतीच्या इमारत विस्तारीकरण कामाचा शुभारंभ भाजप वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते आज पार पडले. हे काम मंजूर करण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख प्रकाश पाटील, सरपंच दीपक चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, तालुका कार्यकारणी सदस्य विजय रावराणे, शक्तिकेंद्र प्रमुख प्रकाश पाटील, सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे, दिगंबर पाटील, मंगेश लोके, युवा अध्यक्ष अतुल सरवटे, रितेश सुतार,हुसेन लांजेकर, श्री पालांडे, रामचंद्र बावदाने, रमेश शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे, भाजप सडुरे बूथ अध्यक्ष प्रकाश रावराणे, दत्ताराम रावराणे, दशरथ पडवळ, बाबुराव रावराणे, दिपक भावे, उदय रहाटे व इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
