२ दिवसा पूर्वी सुनील साबळे हे वंचित बहुजन आघाडीचे दिव्यांग सेलचे कार्यकर्ते व एक प्रामाणिक रिक्षा चालक देखील आहेत. सुनील साबळे यांना त्यांच्या ऑटो मध्ये मोटोरोला कंपनीचा २७,००० हजारचा नवीन (न्यू पॅक) मोबाईल फोन चेंबूर मोबाईल स्टोर या नावाने असलेल्या पिशवी मध्ये त्यांच्या ऑटो मध्ये सापडला. तसेच बसलेला पॅसेंजर तो नवीन फोन विसरून गेला होता. हे लक्षात येताच त्यांनी त्या प्रवाशाला शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रवासी निघून गेला होता. त्यावेळी सुनील साबळे यांनी तो मोबाईल वंचित बहुजन आघाडीच्या घणसोली जनसंपर्क कार्यालयात जमा केला.
तत्काळ वंचित बहुजन आघाडीच्या घणसोली जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री विक्रांत चिकणे साहेब यांच्या जवळ माहिती व मोबाईल देण्यात आला. त्यानंतर कार्यालयाने त्या पिशवी वरील नंबरवर संपर्क करून दुकानदारास माहिती सांगितली व मोबाईल ज्यांच्या नावाने खरेदी केला गेला होता, त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले व संपर्क होताच वंचित बहुजन आघाडीच्या घणसोली जनसंपर्क कार्यालयात त्या प्रवाशाला बोलून त्यांना त्याचा मोबाईल परत केला.
ह्या सर्व गोष्टीतून त्या प्रवाशांने वंचित बहुजन आघाडी चे आभार मनापासून मानले खासकरून प्रामाणिकतेची प्रशंसा केली.
सुनील साबळे यांना मनापासून धन्यवाद व अभिनंदन...
